प्रतिनिधी /पेडणे
पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाच्या सुशोभिकरण प्रकल्पाची पाहणी पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी मंगळवारी 9 रोजी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱयांना 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण होण्याच्या पवित्र स्थळी योग्य ती व्यवस्था आणि छोटेखानी मंडप उभारून त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याविषयी अधिकाऱयांना सूचना केली.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दर वषी स्वातंत्र्यदिनी पत्रादेवी हुतात्मा स्मारकाकडे राज्य पातळीवर मोठय़ा उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. आणि त्या निमित्ताने राज्यातील अनेक देशभक्त स्वातंत्र्यसेनानी सरकारी अधिकारी शिवाय मुख्यमंत्री स्थानिक आमदार उपस्थित असतात आणि त्यांच्या उपस्थितांमध्ये हा कार्यक्रम यशस्वी होत असतो. परंतु यंदा या ठिकाणी पत्रादेवी स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू असल्यामुळे यंदा हा कार्यक्रमात काही अडचणी येऊ शकतात की काय याची पाहणी तालुका उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी केली. आणि तशा प्रकारच्या सूचना अधिकाऱयांना करून कार्यक्रमाला कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे काम करावे अशी सूचना उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी केल्या.









