कोकरूड :
शिराळा तालुक्यातील पाचगणी येथे उभारण्यात आलेल्या कराड पॉवर इंडिया कंपनीच्या पवनऊर्जा प्रकल्पामुळे राष्ट्रीय पक्षी मोरांचा मृत्यू होत असल्याच्या सलग घटना घडत आहेत. काल दोन लांडोर व आज एका मोराचा सावंतवाडी येथे ३३ के. व्ही. विद्युत वहिनीच्या धडकेमुळे विद्युत शॉक लागून मृत्यू झाला.
या घटनेने पुन्हा एकदा वनविभाग व संबंधित कंपनीच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर मनसेच्यावतीने वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) यांचेकडे निवेदन देऊन फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक शेतकरी व प्राणीप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार, कराड पॉवर इंडिया कंपनीची ३३ के. व्ही. लाईन ही जमिनीपासून सुरक्षित उंचीवर नाही. यावर वन्यजीव व पक्ष्यांच्या बसवलेले नाहीत. यामुळे वारंवार मोर, वानर संरक्षणासाठी आवश्यक ते बर्ड डायव्हर्टर व इतर पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. विशेष बसवलेले नाहीत. यामुळे वारंवार मोर, वानर व इतर पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. विशेष म्हणजे ही लाईन बेकायदेशीर असून कंपनीला अशी लाईन चालवण्याची शासन मान्यता नाही. तरीदेखील कंपनीने खाजगी कंत्राटदारामार्फत या लाईनची देखभाल सुरू ठेवली आहे. त्यामुळे सुरक्षा नियमांचे उघड उल्लंघन झाले आहे.
- वनविभागाचे दुर्लक्ष
या घटनांबाबत स्थानिक नागरिकांनी व प्राणीप्रेमींनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र वनविभागाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी राष्ट्रीय पक्ष्यासारख्या अनुसूची-१मध्ये संरक्षित असलेल्या जीवांचा बळी जात आहे.
- गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले की “कराड पॉवर इंडिया कंपनीच्या हलगर्जीपणामुळे व बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या विद्युत लाईनमुळे राष्ट्रीय पक्ष्यांचे प्राण जात आहेत. जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असून तातडीने त्या विद्युत लाईनवर बर्ड डायव्हर्टर बसवावेत, जमिनीपासून कमी अंतरावर असलेल्या सर्व लाईन्स सुरक्षित उंचीवर नेण्यात याव्यात. अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. अन्यथा आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल. कंपनीवर वन्यजीव कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) नवनाथ कांबळे यांच्याकडे केली आहे








