सुरक्षा परिषदेत भारताचे महत्त्वाचे वक्तव्य : दोषींना व्हावी शिक्षा
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ शांतिसैनिक अभियानांना धोका निर्माण झाला आहे. शांतिसैनिकांना आता नॉन स्टेट अॅक्टर्स, दहशतवादी आणि सशस्त्र दलांकडून धोका आहे. सद्यकाळात जागतिक संघर्ष वाढला असून शांतिसैनिकांवरील हल्ले वाढले आहेत. अशा काळात शांतिसैनिकांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्या लोकांना शिक्षा केली जावी असे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी एका महत्त्वपूर्ण बैठकीत म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात शांतिसैनिक अभियानांना आधुनिक करण्याच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत भारताने ही भूमिका मांडली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसैनिकांना आता अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते. यात सशस्त्र दलांचे अस्तित्व, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्यांचा धोका सामील आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आव्हाने आणखी वाढली आहेत. शांतिसैनिकांची सुरक्षा आमची सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. सध्याच्या जटिल संघर्षांच्या काळात आमच्या शांतिसैनिकांना पुरेशी सुरक्षा मिळावी आणि शांतिसैनिकांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई व्हावी हे सुनिश्चित केले जावे असे हरीश यांनी म्हटले आहे.
पुरेसा निधी मिळावा
भारत स्वत:च्या संयुक्त राष्ट्रसंघ शांतता स्थापना केंद्रांमध्ये आधुनिक आव्हानांनसार स्वत:च्या पाठ्याक्रमांना तयार करण्यास इच्छुक आहे. हे केंद्र दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शांतिसैनकांना प्रशिक्षण देत आहे. शांतिसैनिक अभियानांसाठी आधुनिक टेहळणी, संचार आणि डाटा अॅनालिटिक टूल्सची गरज आहे. तसेच त्वरित प्रतिक्रिया क्षमतांना सुधारण्याची आवश्यकता आहे. शांतिसैनिक अभियानांना पुरेसा निधी मिळावा आणि शांतता अभियानांमध्ये सर्वाधिक सैनिक पाठविणारे देश यावरून अत्यंत चिंतेत आहेत असे हरीश यांनी नमूद पेले आहे. शांतिसैनिक अभियानांमध्ये भारताचे 5384 सैनिक तैनात आहेत. सर्वाधिक योगदान देणाऱ्या देशांमध्ये भारत सामील आहे.









