आचरा | प्रतिनिधी
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत सरासरी दहा ते पंधरा टक्के मतदान होते. प्रभाग क्रमांक पाच मधील वरची वाडी केंद्र शाळा नंबर एक मधील मशीन मध्ये बिघाड झाला होता. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी बिघाड झाला होता. अखेर 8 वाजून 55 मिनिटांनी नवीन मशीन बसविण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती. तहसिलदार वर्षा झालटे यांनीही मतदान केंद्राला भेट दिली होती. या निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युती आणि ठाकरे गट महाविकास आघाडी यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. भाजपा शिवसेना युतीचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडीस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे मंगेश टेमकर तर अपक्ष म्हणून जगदीश पांगे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र खरी लढत ही जेरॉन फर्नांडीस आणि मंगेश टेमकर यांच्यात थेट लढत होत आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









