येळ्ळूर : गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात पोलिसांनी येळ्ळूर येथील गणेशोत्सव मंडळाची बैठक बोलावली होती. श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये बैठक पार पडली. या ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांनी गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने काटेकोर नियम पाळावे, नियमांचे उल्लंघन होऊ नये याकडे लक्ष द्यावे, डीजे तसेच स्पीकर चा आवाज न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार पाळावे अशी सूचना केली. गणेशोत्सव साजरा करताना प्रदूषण होऊ नये इतर समाजाला किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये याची प्रत्येकाने दखल घ्यावी. डीजे वर बंदी घालण्यात आली आहे. मिरवणूक काढताना देखील फटाके उडवू नये वेळेत गणपती पूजाअर्चा करावी. विसर्जन देखील वेळेत करावे. अशी सूचना देखील त्यांनी केली. जी मंडळ नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला. पोलीस निरीक्षक लखाप्पा जोडहट्टी यांनी नियमांचे वाचन केले. गणेशोत्सव मंडळे व गणेशोत्सव मंडळांनी सर्व नियम पाळावे असे त्यांनी सांगितले. मंदिरामध्ये गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना करता येणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला ए एस आय गांटाम, बीट हवालदार श्रीकांत उप्पार, हवालदार उदयकुमार पुजार, विठ्ठल नायक, सत्ताप्पा हंचीनमनी, एमबी कोटभागी शिवराज पंच्चान्नावर, बाळेश पन्हाळा आदी पोलीस उपस्थित होते. बैठकीला ग्रामपंचायत सदस्य दयानंद उगाडे, राकेश परीट, परशुराम परीट माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश कुकजी, राजू पावल, तानाजी हलगेकर, रमेश मेणसे यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. धामणे, देसुर, अवचारहट्टी येथील गणेश मंडळाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









