नवी दिल्ली
डिजिटल देवाणघेवाणीच्या व्यवहारात कार्यरत कंपनी पेटीएमचा जूनअखेरचा तिमाही निकाल नुकताच जाहीर झाला असून तोट्यात घट कमी झाली आहे. एप्रिल ते जून या अवधीत कंपनीचा तोटा 358 कोटी रुपयांवर राहिला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कालावधीत कंपनीने 645 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. शुक्रवारी पेटीएमच्या समभागाच्या भावात 1 टक्के घट झाली होती. 6 महिन्यात समभाग 54 टक्के इतका वाढला आहे.








