मुंबई :
ऑनलाइन देवाणघेवाणाच्या व्यवहारात असणाऱ्या पेटीएमचे समभाग शेअरबाजारात मंगळवारी घसरणीत असताना दिसले. सॉफ्टबँकेने या कंपनीतील समभागांची विक्री केल्याचा परिणाम समभागावर नकारात्मक दिसला आहे. पेटीएमचा समभाग मंगळवारी 3 टक्के इतका घसरत 57 रुपयांवर खाली आला होता. सॉफ्टबँकेने 2.01 टक्के इतका पेटीएममधील हिस्सा विक्री केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.









