पहिल्या तिमाहीत नफा 123 कोटींवर
मुंबई :
ऑनलाईन पेमेंट आणि वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी पेटीएमने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 123 कोटी रुपयांचा नफा (एकत्रित निव्वळ नफा) कमावला आहे. एप्रिल-जून 2025 मध्ये कंपनीला 839 कोटींचा तोटा झाला. पेटीएमची मूळ कंपनी वन-97 कम्युनिकेशन्सने मंगळवारी (22 जुलै) एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, एप्रिल-जून तिमाहीत पेटीएमने कामकाजातून 1,918 कोटींचे उत्पन्न मिळवले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 28 टक्के जास्त आहे. कंपनीने एप्रिल-जून 2025 मध्ये 1,502 कोटींचे उत्पन्न मिळवले.
समभाग वर्षात 133 टक्क्यांनी वाढले
पेटीएमचे शेअर्स 22 जुलै रोजी 3.48 टक्क्यांच्या वाढीसह 1,053.10 वर बंद झाले. गेल्या 5 दिवसांत 5 टक्के आणि या वर्षी 6 टक्के वाढ झाली आहे. पेटीएमच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात 20 टक्के, 6 महिन्यांत 25टक्के आणि एका वर्षात 133 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 67.15 हजार कोटी रुपये आहे.









