शेतकऱ्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला पूर आला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बळ्ळारी नाला आणि लेंडी नाला यामुळे बेळगाव शहरासह परिसरातील शिवाराला पूर येत आहे. त्यामुळे या दोन्ही नाल्यांचे रुंदीकरण व खोदाई केली पाहिजे त्यामुळे निश्चितच शिवार आणि शहराला महापूर येणार नाही. तेव्हा तातडीने या दोन्ही नाल्यांची खोदाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव, मारुती सावंत, पारीस जनगौडा, सुभाष शेरी, दीपक मुदक्कण्णावर, बसवंत पाटील, इराप्पा अष्टेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.