उन्हाळा ,पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूत फिरण्यासाठी वेगवेगळे पर्यटन स्थळे पर्यटकांनी ठरवून ठेवलेले असतात. काहीना उन्हाळ्यात फिरायला बरं वाटतं तर काहींना पावसाळा कम्फर्टेबल वाटतो. मनमुराद भिजण्याचा आनंद पावसाळ्यात एकदम एन्जॉय करतात. यावर्षीचा उन्हाळा नुकताच संपत आलाय आता पर्यटकांचं लक्ष लागले आहे ते पावसाळ्याचे.गेले काही महिने उन्हाची काहिली सहन केल्यानंतर आता झालेले पावसाचे आगमन हे अतिशय सुखावह आहे. अशा वेळी सर्वांना वेध लागतात ते बाहेर फिरायला जाण्याचे. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत किंवा कुटुंबासोबत पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याची मजा काही औरच आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही हटके ठिकाणांची माहिती देणार आहोत ज्याला तुम्ही पावसाळ्यात भेट देऊ शकता. महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असेल, जिथे उत्तम समुद्रकिनारा, पर्वत व किल्ले, घाट, पठार असा सर्व प्रकारच्या निसर्गाच्या छटा आढळतात. त्यात पावसाळ्यातील महाराष्ट्र म्हणजे जणू काही स्वर्गच..
दापोली
महाराष्ट्रातील काही निसर्गरम्य, निवांत असणारे, स्वच्छ आणि कमी गर्दीचे समुद्रकिनारे. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. ही तीनही थकणे कोकणात असल्याने या ठिकाणी जायचा रस्तादेखील पावसाळ्यात तितकाच नयनरम्य असतो.
भीमाशंकर
पुण्यातील जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे घनदाट अरण्याने समृध्द असे ठिकाण आहे. भीमा नदीचा उगमही याच अरण्यातून होतो. हे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य निसर्गाने इथे उधळलेले असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
लोणावळाः
मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण सोयीचं पर्यटनस्थळ आहे. लोणावळ्यात रे वूड पार्क, वाळवण डॅम, टायगर्स पॉईंट असे अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पावसाळ्यात पर्यटकांसाठी टायगर धबधबा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
चिखलदराः अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेच्या ठिकाणांपैकी चिखलदरा एक आहे. सोबतच येथे विविध वन्य प्राणी सुद्धा पाहायला मिळतात.
अंबोलीः
अंबोली म्हणजे स्वर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे महाराष्ट्राची राणी म्हणून ओळखलं जाणारं हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात या ठिकाणाची शोभा पाहण्यासारखी असते. येथील वातावरण थंड, शांत आणि प्रसन्न असतं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









