दिल्ली :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्यासमवेत पवार यांची भेट दिल्लीत घेतली. उदय सामंत यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत या भेटीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतच चर्चा झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणातील घडामोडी पाहता या भेटीचे विविध अर्थ काढले जाऊ लागले आहेत.








