ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळय़ाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकाच मंचावर आहेत.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंतप्रधान मोदी मंचावर दाखल होताच उपस्थित नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यामध्ये शरद पवार हे देखील होते. पंतप्रधान मोदी जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करत मोदींचं स्वागत केलं. त्यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली. त्यानंतर पवारांनी मनमोकळेपणाने हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकली. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलं नसलं नाही. मात्र, मंचावरील उपस्थितांच्या चेहऱ्यांवरील हास्य त्यावेळी लपून राहिलं नाही.








