अनेक पक्षांसोबत सुरू आहे चर्चा
वृत्तसंस्था/ पाटणा
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहची पत्नी ज्योति सिंहने बिहारमध्ये निवडणूक लढविणार असल्याची औपचारिक घोषणा केली आहे. अनेक पक्षांशी यासंबंधी चचां सुरू आहे. कुठल्याही पक्षासोबत अंतिम बैठक झाल्यावर स्वत:च्या मतदारसंघाची घोषणा करणार आहे. जर कुठल्याही पक्षाने संधी दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे ज्योति सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
ज्योति सिंह यांनी काराकाट आणि डेहरी येथे सक्रीयता वाढविली आहे. यामुळे त्या या दोनपैकी एका मतदारसंघाची निवड करू शकतात असे मानले जात आहे. यापूर्वी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पती पवन सिंहसाठी ज्योति यांनी काराकट येथे प्रचार केला होता.
यापूर्वी ज्योति सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक करत बिहारसाठी त्यांनी जे काम केले, ते अन्य कुठलाही मुख्यमंत्री करू शकला नसता असे अद्गार काढले होते. तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्याचे श्रेय त्यांनी नितीश कुमार यांना दिले होते. पवन सिंह यांना लोकसभा निवडणुकीत काराकाट मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मतदारसंघात महाआघाडीच्ये उमेदवार राजाराम सिंह यांचा विजय झाला होता. तर रालोआचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांना पराभव पत्करावा लागला होता.









