वाहन क्षेत्रातील वेतन घेण्यात राहिले अव्वल : जयदेव गल्ला दुसऱ्या स्थानी
मुंबई :
भारतातील लोकप्रिय मोटारसायकल आणि स्कूटर निर्मितीमधील कंपनी हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल हे आर्थिक वर्ष 2025 मध्ये वाहन क्षेत्रातील सर्वांधिक वेतन घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले आहेत.
या कालावधीत पवन मुंजाल यांचा पगार 109.41 कोटी रुपये होता. हा पगार आर्थिक वर्ष 2024 च्या समतुल्य आहे. पवन मुंजाल यांचा मूळ पगार, भत्ते आणि निवृत्ती भत्ते कमी झाले आहेत परंतु त्यांचा कमिशन भत्ता वाढला आहे, ज्यामुळे दोन्ही वर्षांसाठी त्यांचा पगार स्थिर राहिला आहे.
ऑटो क्षेत्रातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ
अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जयदेव गल्ला हे सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये जयदेव गल्ला यांनी 67.29 कोटी रुपये पगार घेतला आहे. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये राजीव बजाज यांनी 58.58 कोटी रुपये पगार घेतला आहे.
महिंद्रा ग्रुपचे ग्रुप सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अनिश शाह यांचे नाव आता या यादीत समाविष्ट झाले आहे. अनिश शाह यांचा पगार 95 टक्क्यांनी वाढला आहे, ज्यामुळे आर्थिक वर्ष 2025 मध्ये त्यांचा पगार 47.33 कोटी रुपये झाला आहे.
काहींची झाली कपात
ऑटो क्षेत्रातील सीईओंच्या पगारात वाढ झाल्याने काही सीईओंच्या पगारातही कपात झाली आहे. यामध्ये अपोलो टायर्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज कंवर यांचा समावेश आहे, ज्यांचे पगार 40 टक्क्यांनी कमी करून 40 कोटी रुपये करण्यात आले आहेत.









