सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली गोदरेज अँड बॉयसची याचिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बुलेट ट्रेन प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवत गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंगच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात कंपनीकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुंबईतील कंपनीच्या जागेचे अधिग्रहण रोखण्याचा आदेश देण्यास नकार दिला होता.
मुंबईतील विक्रोळीमध्ये गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा भूखंड आहे. या भूखंडातूनच बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असल्याने सरकारने याचे अधिग्रहण केले होते. या अधिग्रहणाच्या विरोधात कंपनीने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुनावणी करता सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा प्रकल्प राष्ट्रीय महत्त्वाचा असल्याची टिप्पणी केली आहे.
गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून ही याचिका 9 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली होती. यात कंपनीने भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना अधिनियम 2013 च्या अंतर्गत योग्य भरपाईची मागणी केली होती.









