द वॅम्पायर डायरीज फेम अभिनेता
द वॅम्पायर डायरीज या प्रसिद्ध सीरिजमध्ये स्टीफन सल्वाटोर या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेता पॉल वेस्लीने स्वत:ची प्रेयसी आणि मॉडेल नताली कुकेनबर्गसोबत एंगेजमेंट केली आहे. दोघेही सुमारे 2 वर्षांपासून डेट करत होते. पॉल हा 42 वर्षांचा असून त्याची प्रेयसी नताली 25 वर्षांची आहे. त्यांची एंगेजमेंट ही इटली येथे पार पडली आहे.
कुकेनबर्गने इन्स्टाग्रामवर एंगेजमेंटची घोषणा करत काही खास क्षणांची छायाचित्रे शेअर केली आहेत. तर पॉलने नतालियासोबतची सेल्फी शेअर केली. दोघेही 2022 पासून परस्परांना डेट करत होते. परंतु दोघांनीही या रिलेशनशिपला फारसे चर्चेत येऊ दिले नव्हते.
पॉल वेस्ली आणि नताली यांच्या वयात 17 वर्षांचे अंतर आहे. वेस्ली याला ‘बिनीथ द ब्ल्यू’ आणि ‘रोल बाउन्स’ यासारख्या प्रोजेक्ट्समधील अभिनयासाठी ओळखले जाते. पॉलचा पहिला विवाह गायिका टॉरी डेविटोसोबत झाला होता. परंतु 2013 साली दोघांनी घटस्फोट घेतला होता.









