वर्दळ वाढल्याने अपघाताचा धोका
वाळपई : पाटवळ – खोतोडा येथील अऊंद असलेला जुना पुल कमकुवत बनला आहे. पुलावरून वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघात घडण्याची शक्मयता आहे. तसेच बाराजण ते पाटवळ पर्यंतचा रस्ता अऊंद असल्याने गेल्या वर्षभरात दोन -तीन अपघात घडले आहेत. अऊंद रस्त्यावरून विद्यार्थी प्रवास करीत असल्याने धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने उपाय काढण्याची मागणी होत आहे. बाराजण ते पाटवळ गावात जाणारा अंदाजे एक किलो मीटरचा रस्ता अऊंद असल्याने गेल्या वर्ष भरात अनेक अपघात घडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावरून वाहनाची वर्दळ वाढली आहे. परंतु अऊंद रस्ता आणि अऊंद पुलामुळे अपघात घडण्याची अधिक शक्मयता आहे. वाळपई येथून मोले येथे जाणारी अधिकतर वाहने पाटवळ गावातून वाहतूक करीत असतात. अऊंद रस्त्यावर कित्येक वाहने सुसाट वेगाने जात असल्याने स्थानिकांचा सुरक्षेचा प्रŽ गंभीर बनला आहे. त्यात गेल्या वर्ष भरात तीन पेक्षा अधिक अपघात घडल्याने विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे नाहीत. गेल्या 15 दिवसात सांगे व बाणास्तारी येथील पुलावर भीषण अपघात घडल्याने पाटवळ गावातील पुलावर रात्रीच्यावेळी अपघात घडण्याची शक्मयता वाढली आहे. मुख्य म्हणजे वाहन चालकांना अऊंद पुलावर धोका असल्याची सूचना देणारे फलक सुद्धा नसल्याने सुसाट वेगाने धावणारे वाहन रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहन पुलाजवळ थेट पाण्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाहन चालकांना धोका दर्शविणारे फलक लावण्याची गरज आहे. सुमारे 3 महिन्यापूर्वी अऊंद रस्त्यावर तीन दुचाक्मयाच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे गावातून ये जा करणाऱ्या वाहनाचा वेग कमी करण्यासाठी परिसरात गतिरोधक घालण्याची मागणी लोकांकडून होत आहे.









