प्रतिनिधी / बेळगाव : भरतेश शिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे रोबोंच्या सलामीचा आगळा कार्यक्रम सादर करण्यात आला. सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असल्याने याचे औचित्य साधून 75 रोबोंनी सलामी दिली. या उपक्रमाने देशभक्तीचा जागर करण्यात आला. पी.बी. रोड येथील रूपाली सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उद्यमबाग येतील शांती केमीकल्सचे संचालक संतोष पोरवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर इस्रो संस्थेचे माजी अधिकारी सुनीलकुमार, अट्टल इनोवेशन मिशनचे प्रमुख सुमन पंडीत आणि सी.टी. ई. संस्थेचे मुख्याध्यापक एम.एम. सिंदूर हे उपस्थित होते. तसेच भरतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर, सचिव श्रीपाल खेमलापूर, संचालक भूषण मिरजी, प्रकाश उपाध्ये आदी उपस्थित होते. प्राचार्य एस. एन. अक्की यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे नियोजन अनुराधा तिगडी आणि नितीन रेवणकर यांनी केले होते. या कार्यक्रमात 75 शाळांमधून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या प्रकल्पांचे प्रदर्शन देखील सादर करण्यात आले.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन