Money Laundering Case: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडी (ED) कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. पीएमएलए न्यायालयाने असा आदेश दिला आहे. न्यायालयानं राऊतांना दुसऱ्यांदा सुनावलेली ईडी कोठडी आज संपत असल्यानं संजय राऊतांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान संजय राऊतांच्या वकिलांकडून आज पुन्हा जामिनाची मागणी करण्यात आलीय. (Patra Chawl Scam Case Update)
संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी 31 जुलै रोजी रात्री उशीरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन वेळा ईडी कोढडी सुनावली. दरम्यान आज त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना २२ ऑगस्टनंतर जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ईडी कोढडीत राऊतांना घरचं जेवणं, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केली होती. त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे.
हेही वाचा- मंत्रिमंडळ विस्ताराच अखेर ठरलं! उद्या राजभवनावर होणार शपथविधी
दरम्यान,संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने ८ तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. यावेळी ईडीने त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत,” असं मत वर्षा राऊत यांनी ईडीच्या चौकशीनंतर व्यक्त केलं होतं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









