वृत्तसंस्था / नोयडा
2024 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरेटसने गुजरात जायंटसचा 40-27 असा एकतर्फी पराभव केला.
या सामन्यात पाटणा पायरेटस संघातील अयान लोचाबने दर्जेदार खेळ करत 10 गुण मिळविले. पाटणा पायरेटसच्या देवांक दलाल आणि संदीप यांनी अनुक्रमे 6 आणि 5 गुण मिळविले. या सामन्यात पहिल्या 20 मिनिटात पाटणा पायरेटसने गुजरात जायंटसवर 21-16 अशी आघाडी घेतली होती. पाटणा पायरेटसच्या खेळाडूंनी अचूक चढायांवर गुजरात जायंटसचे सर्व गडी बाद केले. त्यानंतर सामन्याच्या उत्तराधार्थ पाटणा पायरेटसने दुसऱ्यांदा गुजरात जायंटसचे सर्व गडी बाद करुन भक्कम आघाडी आणि शेवटी 13 गुणांच्या फरकाने विजय मिळविला. गुजरात जायंटसतर्फे मोहीतची कामगिरी एकाकी ठरली.









