ग्रामपंचायतीचे जाणूनबुजून दुर्लक्ष : डांबरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
वार्ताहर /कडोली
कडोली येथील अयोध्यानगरमधील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून याकडे ग्रामपंचायतीने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. तर पीडीओ दुटप्पीपणाचे धोरण अवलंबित असल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. येथील अयोध्यानगरात गेल्या महिन्याभरापासून रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांना ये-जा करणे अवघड झाले आहे. डांबरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी ख•s पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अयोध्यानगरमधील समस्यांकडे सत्ताधारी ग्रा. पं. जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. या वॉर्डमधील ग्रा. पं. सदस्यांनाही सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरुन पीडीओ केराची टोपली दाखवत आहेत की काय? असा संशय निर्माण होत आहे. या वॉर्डमधील सदस्य कामगार घेऊन दुरुस्तीकडे काम करीत असताना त्या कामगारांना दुसरीकडे काम लावण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कामगार पाठविण्यासाठीही राजकारण
येथील ग्रा. पं. सदस्याने स्वत: नियोजन करून तात्पुरत्या स्वरुपात चिपिंग आणली आहे. परंतु हे चिपिंग घालून ख•s बुजविण्यासाठी कामगारांची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु कामगार पाठविण्यासाठीही राजकारण केले जात आहे. याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्त्याच्या बाजूला चिपिंग टाकण्यात आल्याने वाहने जाणे अवघड झाले आहे. हे ग्रा. पं. ला दिसत नाही का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.









