शाहरुख खान अन् दीपिका पदूकोनचा चित्रपट
शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठान’ दीर्घकाळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या गाण्यापासून पेहरावापर्यंत अनेक गोष्टींवर वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या बहिष्काराची मागणी सातत्याने होत आहे. ‘पठान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
पठान चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना ऍक्शन, थ्रिल आणि सस्पेन्स तिन्हींचा डोस मिळणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. पठान चित्रपटात जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याने व्हिलनची भूमिका साकारली आहे. तर शाहरुख खान हा गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये मशीनगनपासून एरियल स्टंटपर्यंत ऍक्शनचा फूल डोस दिसून येत आहे. तसश्sच यात शाहरुखचा एक डायलॉग देखील लक्ष वेधून घेत आहे. ‘एक सोल्जर ये नहीं पुछता की देश ने उसके लिए क्या किया, वो पूछता है कि वो देश के लिए क्या कर सकता है’ हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहरुख खानसाठी पठान हा चित्रपट अत्यंत खास आहे. चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी शाहरुख त्याच्या प्रमोशनला पूर्ण वेळ देत आहे. चित्रपटात शाहरुख हा एक स्पाय एजंटच्या भूमिकेत दिसून येणार आहे. पठान या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सकडुन करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण जगभरातील अनेक सुंदर ठिकाणी करण्यात आली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदूकोन आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत डिंपल कपाडिया तसेच आशुतोष राणा हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट 25 जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.









