वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पटेल रिटेल यांचा आयपीओ 95 पट इतका शेवटच्या दिवशी सबक्राईब झाला आहे. कंपनी सदरच्या आयपीओच्या माध्यमातून 242 कोटी रुपये उभारणार आहे. तीन दिवसांच्या कालावधीमध्ये आयपीओला 95 पट इतका प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दिला आहे. पटेल रिटेलच्या आयपीओमध्ये पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 272 पट आयपीओ सबक्राईब केला आहे. या तुलनेमध्ये बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 108 पट आयपीओ सबक्राईब केला आहे. रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांनी 42.49 पट आयपीओ सबक्राईब केला आहे. आयपीओ अंतर्गत 85.18 लाख ताजे समभाग आणि 10.02 लाख समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रवर्तकांकडून विक्रीसाठी सादर करण्यात आले आहेत. 237 ते 255 इतकी आयपीओची समभागाची इशू किंमत निश्चित करण्यात आली आहे.
कंपनीची ओळख
2008 मध्ये स्थापन झालेली ही रिटेल सुपरमार्केट कंपनी आहे. खाद्य उत्पादने, बिगर खाद्य उत्पादने, इतर वस्तूंची विक्री आणि अॅपारेल आदी वस्तुंची विक्री करते. टायर तीन शहरांमध्ये व जवळपासच्या उपनगरांमध्ये कंपनीने आपला विस्तार केला आहे. कंपनीने पटेल आर मार्ट नावाने अंबरनाथ, महाराष्ट्र येथे पहिले स्टोअर सुरु केले. 31 मे 2025 पर्यंत कंपनीची 43 स्टोअर्स महाराष्ट्रात कार्यरत आहेत.









