नमन पाटीलला गटात वैयक्तीक विजेतेपद
बेळगाव : इचलकरंजी, कोल्हापूर निमंत्रितांच्या वीर सावरकर चषक आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या पॅशेनेट जलतरण क्लबच्या 8 जलतरणपटुनी घवघवीत यश संपादन केले आहे. इचलकरंजी येथे घेण्यात आलेल्या या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या पॅशनेट क्लबच्या खेळाडूंनी भाग घेतला होता.या स्पर्धेत नमन नंदकुमार पाटील गट 7 मध्ये 50 मी. बटरफ्लॉय 59.00 सेकंद सुवर्ण, 50 मी. बॅकस्ट्रोक 46.82 सेकंद सुवर्ण, 50 मी. ब्र्रेस्टस्ट्रोक 59.31 सेकंद सुवर्ण, 50 मी. फ्रीस्टाईल 42.22 सेकंद सुवर्ण पदकासह वैयक्तीक विजेतेपद पटकाविले. सिद्धार्थ कुऊंदवाड गट 3 मध्ये 50 मी. ब्र्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्य, प्रणित परमशेट्टी गट 4 मध्ये 50 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य, रेयांश सिंग संधू गट 4 मध्ये 50 मी. बॅकस्ट्रोक 40.24 सेकंद सुवर्ण, 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात कांस्य, 200 मी. वैयक्तीक मेडले प्रकारात कांस्य, कृषा कुलकर्णी गट 7 मध्ये 50 मी. फ्रीस्टाइल प्रकारात कांस्य, 50 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य, ध्रुवा चव्हाण गट 6 मध्ये 50 मी. बटरफ्लॉय कांस्य, 50 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पटकाविले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशिक्षक शामसुंदर मालाई त्यांच्या सहकार्यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे.









