प्रवास होणार सुखकर : प्रायोगिक तत्त्वावर सेवा
बेळगाव : राज्य परिवहन मंडळाने बस वाहतुकीत अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांतर्गत बसचे लोकेशन आणि इतर माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना शहरांतर्गत प्रवास करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपली बस कोठे आहे तसेच किती वाजता येणार आहे याबातची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हुबळी-धारवाड शहरात ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. बेळगाव शहरातही ही सुविधा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. गुगल मॅपद्वारे प्रवाशांना बस कधी सुटणार आहे, सध्या कुठे आहे. याबाबतची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यावर ताटकळत थांबण्याची समस्या मिटणार आहे. यासाठी बसमध्ये जीपीएस सेवा उपलब्ध केली जाणार आहे. तर काही बसमध्ये ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. या माध्यमातून प्रवाशांना बसबाबतची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. या सेवेमुळे बस कोणत्या रस्त्यावरून येत आहे, सध्या ती कोठे आहे? आणि पुढील थांब्यावर पोहोचण्यासाठी अंदाजे किती वेळ लागणार आहे? याबाबतची माहिती मिळणार आहे. यासाठी बसमध्ये जीपीएस यंत्रणाही बसविली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवून दिला आहे. याबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.









