अकासा एअरने सरकारकडे दिली कबुली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अकासा एअरने 7 ऑगस्ट रोजी स्वतःची कमर्शियल सर्व्हिस सुरू केली आहे. अकासा एअरलाइन्सच्या काही प्रवाशांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या वैयक्ति माहितीत त्यांचे नाव, ईमेल आयडी अन् मोबाइल क्रमांक यासारखा डाटा लीक झाला आहे.
या घटनेची माहिती कंपनीने सरकारला दिली आहे. कंपनीने स्वतःच्या वेबसाइटवर तिकीट आरक्षित करणाऱया सर्व प्रवाशांना या डाटा लीकसंबंधी माहिती दिली आहे. हे प्रकरण सायबर सुरक्षेशी निगडित आहे. अशा प्रकरणांना हाताळणाऱया इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी नोडल एजेन्सी, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला यासंबंधी पूर्ण माहिती देण्यात आल्याचे अकासा एअरने म्हटले आहे.









