ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. राज्याच्या कोविड टास्क फोर्सने त्यासंदर्भातील सूचना जारी केल्या आहेत.
राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मागील काही दिवसांपूर्वी दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्या अनुषंगाने आज कोविड टास्क फोर्सने या दोन्ही ठिकाणांवरुन येणाऱ्या व्यक्तांची कोरोना चाचणी करावी, अशी सूचना टास्क फोर्सने राज्य सरकारला केली आहे.
त्यानंतर राज्य सरकारने एअरलाईन्ससोबत बोलणी करत चाचणीसंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सूरू होणार आहे. सध्या परदेशातून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहेत. यातील पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.