विजयनगरम जिल्ह्यातील घटना : तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी रात्री विशाखापट्टणमहून रायगडला जाणारी प्रवासी रेल्वे रूळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना घडली. रेल्वे ऊळावरून घसरल्यानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे मदत आणि बचाव कार्य कठीण होत असले तरी आजूबाजूच्या गावातील लोकांसह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही अहवालांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे. तसेच एक्स्प्रेस रेल्वे एका थांबलेल्या रेल्वेला धडकल्यानंतर रुळावरून घसरल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रे•ाr यांनी तात्काळ प्रभावाने मदत उपाययोजना करण्याचे आणि जवळच्या जिह्यांतून जास्तीत जास्त रूग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी रुग्णालयांना जारी केले आहेत.









