मुंबई
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा केव्ज जाणारी प्रवासी बोट बु़डाली. या बोटीत २० ते २५ प्रवासी असल्याीच प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत जीवितहानी होण्याची ही शक्यता वर्तविली जात आहे.
या संदर्भात प्राथमिक माहिती अशी मिळाली, गेट वे ऑफ इंडिया येथील एलिफंटा केव्ज च्या दिशेने ही प्रवासी बोट चालली होती. समुद्रात गेल्यानंतर अचानक बोट बुडाली. JOC येथून मिळालेल्या माहिती नुसार नीलकमल नावाची फेरीबोट एलिफंटा केव्जच्या दिशेने चालली होती. उरण, कारंजा येथे बुडाली असेल. या बोटीतील प्रवासींचे बचाव कार्य नौदल, JNPT, coast guard, यलो गेट पोलिस ठाणे आणि स्थानिक मच्छिमार यांच्या सहाय्याने चालू आहे.
बोट बुडाल्याचे लक्षात येताच तातडीने मदतकार्य सुरु केले. आता प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.








