ओटवणे | प्रतिनिधी
कोलगाव भोमवाडी येथील कुलदीप अरुण राऊळ (३८) या युवकाचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्याच्या आकस्मित निधनाचा राऊळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच कोलगाव गावावर शोककळा पसरली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे दर्शन घेत राऊळ कुटुंबियांचे सांत्वन केले. दुपारी शोकाकुल वातावरण त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कुलदीप राऊळ याला सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे निधन झाले. सावंतवाडी येथील नित्या आईस्क्रीम एजन्सीमध्ये तो सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होता. तत्पूर्वी सावंतवाडीत गवळी तिठा येथील अहिल्या मेडिकलमध्येही त्याने काम केले होते. गावातील सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमातही त्याचा सक्रिय सहभाग असायचा. शांत, मनमिळावू व कष्टाळू स्वभावाच्या कुलदीपच्या अकाली व आकस्मित निधनाचा कोलगाववासियांसह त्याच्या मित्र परिवाराला धक्काच बसला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. कोलगाव सरपंच संतोष राऊळ तसेच संदेश राऊळ यांचे ते भाऊ होत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









