ऋतिक रोशनच्या कुटुंबाची सदस्य
ऋतिक रोशनची नातेवाईक पश्मीना रोशन लवकरच इश्क विश्क या चित्रपटाच्या रिमेकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यापूर्वी इश्क विश्क या चित्रपटामधून शाहिद कपूर अन् अमृता रावने बॉलिवूडपमध्ये पाऊल ठेवले होते. पश्मीना दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू पाहत होती.
पश्मीनासोबत या चित्रपटात रोहित श्रॉफ अणि नायला ग्रेवाल यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या दोन्ही कलाकारांनी यापूर्वी स्वतःच्या अभिनयाची झलक पडद्यावर दाखवून दिली आहे. तर या चित्रपटाद्वारे पश्मीना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. माझ्या अनेक वर्षांच्या मेहनतीला फळ मिळत असल्याचे मला वाटतेय. पदार्पणाबद्दल अत्यंत उत्सुक असल्याचे पश्मीनाने म्हटले आहे.
चित्रपटाच्या कहाणीत सोशल मीडिया महत्त्वाचा भाग असणार आहे. चित्रपटाचे नाव इश्क विश्क रिबाउंड असणार आहे. यात नव्या पिढीची कथा दर्शविण्यात येणार आहे. पश्मीनाच्या बॉलिवूड पदार्पणाला ऋतिक रोशनचा पाठिंबा आहे. ऋतिकसह रोशन घराण्यातील अनेक सदस्य बॉलिवूडमध्ये कार्यरत असल्याने पश्मीनाला त्यांच्या अनुभवांमधून बरेच काही शिकता आले आहे.









