ऋतिक रोशनची नातेवाईक पश्मीना रोशन बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पश्मीना ही इश्क विश्क या चित्रपटाद्वारे पदार्पण करणरा आहे. पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. या चित्रपटात ती टायगर श्रॉफसोबत झळकणार आहे. तसेच सारा अली खान देखील यात मुख्य भूमिका साकारत आहे. हा नवा चित्रपट अॅक्शन ड्रामा धाटणीचा असणार आहे. चित्रपटात पश्मीनासोबत टायगर रोमान्स करताना दिसून येईल.
टायगर अन् पश्मीनाची जोडी पाहण्यासाठी चाहते अत्यंत उत्सुक असतील. या चित्रपटाचे नाव ‘हिरो नंबर 1’ असले तरीही तो जुन्या चित्रपटाचा रिमेक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन जगन शक्ती करणार आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण लंडनमध्ये सुरू होणार आहे. टायगर अन् पश्मीना तसेच सारा पुढील वर्षी याच्या चित्रिकरणात सहभागी होतील. पश्मीना ही रोहित सराफ, जिबरान खान आणि नाइला ग्रेवाल यांच्यासोबतच्या चित्रपटातून पदार्पण करेल. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाहीर करण्यात आलेले नाही.









