वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत होणाऱ्या एनसीएए चॅम्पियनशिप ट्रॅक आणि फिल्ड अंतिम स्पर्धेसाठी भारताचा राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अॅथलिट परवेझ खान पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा परवेझ खान हा भारताचा पहिला अॅथलिट आहे.
बोस्टनमध्ये झालेल्या पुरुषांच्या एक मैल पल्ल्याच्या शर्यतीमध्ये परवेझ खानने 3 मिनिटे 57.126 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळवले. 19 वर्षीय परवेझ खानने या स्पर्धेत फ्लोरिडा विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करीत होता. हरियाणातील मेवात येथे परवेझ खानचे कुटुंबीय सदस्य वास्तव्य करीत आहेत. 2022 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते. भारताचे अॅथलिट तेजस्वीन शंकरने 2018 आणि 2022 साली उंच उडी प्रकारात, मोहिंदर सिंग गिलने तिहेरी उडीत तर विकासगौडाने 2006 च्या एनसीएए ट्रॅक फिल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली होती.









