बूट वाटपप्रकरणी एफआयआर नोंदवण्याचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल भाजप उमेदवार परवेश वर्मा यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून पत्र मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी परवेश वर्मा यांच्याविरुद्ध बूट वाटप प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. निवडणूक आयोगाने परवेश वर्मा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले आहे. आम आदमी पक्षाने यासंबंधी आवाज उठवत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती.









