वृत्तसंस्था / दोहा
येथे सुरू असवलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर पर्व चौधरीने दोन कास्य पदकांची कमाई 95 किलो वजन गटात केली. या स्पर्धेत भारताची कामगिरी आतापर्यंत दर्जेदार झाली असून एकून 12 पदकांची कमाई केली आहे.
पर्व चौधरीने 96 किलो वजन गटात ही दोन कास्य पदके क्लिन आणि जर्क तसेच एकूण वजन उचलत मिळविली. त्याने एकूण 303 किलो वजन उचलले. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कास्य पदके मिळविली आहेत.









