परूळे/प्रतिनिधी
Parule-Badhghati slope, the dumper carrying wood fell on the house!
वेंगुर्ले मालवण सागरी मार्गावर परूळे बाधघाटी उत्तारावर डंपरला साईड देताना चिरे वाहतुक करणारा दुसरा डंपर घरावर कलंडला. मात्र, चालकाचे नशीब बलवत्तर असल्याने डंपर घराच्या भिंतीना जाऊन अडकल्याने डंपरचालकाचे प्राण वाचले.गुरूवार दि. १३ रोजी ९ च्या सुमाराला चौके हुन परूळेच्या दिशेने चिरे घेऊन येत असताना दुसर्या डंपरला साईट देत असताना परूळे आचपेवाडी येथील लिंलाधर सामंत याच्या घरा वर डंपर कलंडला या अपघाता दरम्यान घराच्या दोन भिंती कोसळल्या व छपराचे नुकसान झाले वाळू आण्यासाठी भरधाव वेगाने डंपर जात असताना चिरे वाहतुक करणारा डंपरचालक गोंधळला. मात्र, समोरा समोर डंपरचा अपघात वाचविण्यासाठी त्याने डंपर बाजूला घेत असता डंपरवरील ताबा सुटला. डंपर रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरावर कलंडला यात घराचे नुकसान झाले आहे. निवती पोलिस घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.









