आपल्या पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर ठाकरे गटाची भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी ठाकरे गटाचे मुख्य उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या गटातील निष्ठावंतांची बैठक बोलावली. दादर परिसरातील सेना भवनात झालेल्या बैठकीला राज्यसभा सदस्य संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब यांच्यासह अनेक निकटवर्तीय नेते उपस्थित होते.
हेही वाचा >>>> निवडणूक आयोग बरखास्त करा…प्रत्यक्ष निवडणूका घेऊनच आयोगाची नेमणूक करा
शिवसेना संपवण्याचा डाव असल्याचा आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले “पक्षाचे नाव आणि चिन्हे गद्दारांना दिली गेली. पण हे गद्दार ठाकरेंचे नाव चोरू शकत नाहीत. आमचे भवितव्य ठरवण्याची ताकद दिल्लीच्या सरकारमध्ये नाही” असा उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला.
सर्व राजकीय पक्षांनी सतर्क राहण्याचा इशारा देत उद्धव ठाकरेंनी विरोधी एकजुटीचे आवाहन केले आहे. आपल्या राजकीय पक्षाच्या चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाने आपल्याला वाईट वागणूक दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा >>>> मी माझ्या मतावर ठाम…1 लाख गुन्हे दाखल झाले तरी मी शिवसेनेतच- संजय राऊत
निवडणुक आयोगाने निकाल दिल्यानंतर या निर्णायाविरोधात आव्हान देणार असल्याचे सांगताना तसेच निवडणुक आयोगाने आपल्याशी दुजाभाव केला असा आरोप करताना ते म्हणाले, “माझ्या जवळचे सर्व काही चोरले गेले आहे. आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेले तरी ‘ठाकरे’ हे नाव त्यांना चोरता येणार नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून उद्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.” असेही ते म्हणाले