खानापूर : खानापुरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने सुरू असलेल्या दुर्गा दौडमध्ये पाचव्या दिवशी शहरातील युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पहाटे 5.30 वाजता शिवस्मारक येथील शिवाजी मूर्तीची भू-विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील आणि प्रदीप जांबोटकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर ध्वजपूजनाने दौडीला प्रारंभ करण्यात आला. दौड शिवस्मारक, न्यू निंगापूर गल्ली, नागलिंगनगर येथील नागरिकांनी दौडीचे भव्य स्वागत केले. येथील नागलिंग मंदिरात आरती केल्यानंतर दौड घोडे गल्ली येथील लक्ष्मी नारायण मंदिरात आली. या ठिकाणी महिलांनी ध्वजाची आरती केली. यानंतर श्री स्वामी समर्थ केंद्रात सेवेकऱ्यांनी दौडीचे भव्य स्वागत व आरती केली. यानंतर अर्बन बँक येथील दुर्गादेवी मंडपात आरती करून नदी घाटावरील पंचमुखी महादेव मंदिराकडून भट गल्ली, बालाजी मंदिर येथून चौराशी मंदिरात दौडीची सांगता झाली.
दौडीचा उद्याचा मार्ग
शनिवार दि. 21 रोजी शिवस्मारक, निंगापूर गल्ली, घोडे गल्ली, देसाई गल्ली, श्ा़dरी विठ्ठल मंदिर, बेंद्रे खुट, चिरमुरकर गल्ली, स्टेशन रोड, श्री लक्ष्मी मंदिर येथे सांगता होणार आहे.









