सावंतवाडी प्रतिनिधी
अखिल भारतीय महिला काँग्रेस आयोजित जिल्हा अध्यक्षा ,प्रदेश पदाधिकारी,यांचं वार्षिक दोन दिवसीय संमेलन संपन्न झाले . यावेळी प्रतिज्ञा उज्वल भारत की महिला काँग्रेस अँपचे उद्धघाटन करण्यात आले दोन दिवसीय संमेलनामध्ये महिला काँग्रेसची ताकद दिसून आली . यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष.मल्लिकार्जुन खर्गे ,जनरल सेक्रेटरी सन वेणूंगोपालजी ,सर्व राज्याच्या प्रदेश्अध्यक्षा ,राष्ट्रीय प्रवक्ते ,यांचे मार्गदर्शन् ,प्रत्येक राज्याचा आढावा तसेच् मोठमोठ्या महिला आजी ,माजी मंत्र्यांचे मार्गदर्शन या संमेलनात सर्व महिलांना देण्यात आले .येणाऱ्या निवडणुकीत खासकरून विधानसभा ,लोकसभा यामध्ये महिला वर्गाकडून पक्षाला खूप अपेक्षा आहेत. कारण परेन्ट बॉडी नंतर महिला फ्रन्टल ऑरगेनासेशन हे महत्वाचं पद आहे. भविष्यात् मोठ्या प्रमाणात महिलांना संधी देण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त महिलांना ताकत देण्याचा मानस सन वेणूगोपाल यांनी जाहीर केले . राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांनी महिलांच्या उपस्थितीविषयी कौतुक केले.
या संमेलनात सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा यांनी सहभाग् दर्शवला. यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सौ वंजारी यांनी जिल्याची असणारी पक्षाची संघटनात्मक स्थिती मांडली . सिंधुदुर्ग जिल्याच्या राजकारणात लवकरच खूप मोठ्या घडामोडी होतील अशी आशा आहे . असे मत व्यक्त करण्यात आले .









