वृत्तसंस्था/ मुंबई
येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या संकुलात 6 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत भारताचा अव्वल स्नूकरपटू तसेच आतापर्यंत अनेक वेळेला विश्व चॅम्पियन ठरलेला पंकज अडवाणी सहभागी होणार आहे. या स्पर्धेमध्ये अनेक अव्वल स्पर्धेक भाग घेणार आहेत.
या स्पर्धेसाठी एकूण बक्षिसाची रक्कम 18.5 लाख रुपये ठेवण्यात आली असून गेल्या वर्षी लक्ष्मण रावतने जेतेपद तर आदित्य मेहताने उपविजेतेपद मिळविले होते. 2022 साली पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजित केली होती आणि सौरभ कोठारीने अजिंक्यपद पटकाविले होते. या स्पर्धेत प्रमुख ड्रॉमध्ये 32 स्नूकरपटूंना प्रवेश दिला जाणार असून 13 जानेवारीपासून प्रमुख ड्रॉतील लढतीना प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला 5 लाख रुपये तर उपविजेत्याला 2.5 लाख रुपयाचे बक्षिस दिले जाईल. उपांत्यफेरी हरणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये बक्षिस म्हणून दिले जाईल.









