वाळपई : ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमातून सत्तरी तालुक्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये कलश यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला. आज शुक्रवारी वाळपई शहरांमध्ये कलश यात्रा वाळपई गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत गेली. त्यानंतर सर्व कलाशातील माती गट विकास कार्यालयाच्या कलशामध्ये घालण्यात आली. सदर कलश नेहरू युवा केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार असून त्यानंतर तो दिल्लीमध्ये पाठविण्यात येणार आहे. सर्व पंचायतींच्या सहकार्याबद्दल वाळपई गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे सरदेसाई यांनी सर्व पंचायतीचे आभार व्यक्त केले.
कलश यात्रेची सुऊवात छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानातून करण्यात आली. यावेळी सत्तरी तालुक्यातील सर्व पंचायतीच्या सरपंचांनी कलश घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभाग दर्शविला. केंद्र सरकारच्या मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम होत असून त्याची सुऊवात दोन दिवसापूर्वी केलेली आहे. प्रत्येक पंचायतीमधून पंचायत मंडळांनी कलशामध्ये आपल्या भागातील माती घालून ते कलश आणले होते, असे सूर्याजीराव राणे सरदेसाई यांनी सांगितले. सत्तरी तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा यासाठी हर घर तिरंगा हा उपक्रम आयोजित केला असून याला चांगला प्रतिसाद लाभेल, अशी आशा गटविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. या कलश यात्रेमध्ये भिरोंडा पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे, केरी सरपंच दीक्षा गावस, पर्ये सरपंच रती गावकर, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, ठाणे सरपंच सरिता गावकर, नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर, सरपंच उज्वला गावकर, खोतोडा सरपंच नामदेव राणे, गुळेली सरपंच नितेश गावडे व नगरगाव जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे विविध पंचायतीचे कर्मचारी, पंच सभासद, उपसरपंच, वाळपई गटविकास कार्यालयाचे अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.









