उर्वरित रस्ता काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
सांबरा : सांबरा रोड मारुतीनगर येथील एस सी मोटर्ससमोरील रस्त्याचे काम अर्धवट केल्याने अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे संबंधितांनी तातडीने काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. अलीकडेच एससी मोटर्ससमोरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र सदर काम करताना अनेक ठिकाणी काम अर्धवट सोडण्यात आले आहे. एससी मोटर्ससमोरील वसाहतीत गेलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी धोकादायक चरी वजा ख•ा निर्माण झालेले आहेत. या चरी वजा खड्ड्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी तर हे ख•s धोकादायक बनले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता केलेल्या कंत्राटदाराला समज देऊन या धोकादायक चरी बुजवाव्यात, अशी वाहनचालकांतून मागणी होत आहे.









