नवी दिल्ली :
2025 च्या आपीएल क्रिकेट हंगामासाठी गुजरात टायटन्स संघाने आपल्या प्रशिक्षकवर्गामध्ये भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज पार्थीव पटेलचा समावेश केला आहे. गुजरात टायटन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती गुरुवारी दिली. पार्थीव पटेल गुजरात टायटन संघाचा सहाय्यक फलंदाज प्रशिक्षक म्हणून राहिल. गुजरात टायटन्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी आशिष नेहराकडे सोपविण्यात आली आहे. आता पार्थीव पटेल या संघाला फलंदाजीचे मार्गदर्शन करेल. 2020 साली पार्थीव पटेलने क्रिकेट क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर केली होती. पार्थीव पटेल आता पहिल्यांदाज प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश करीत आहे.









