युनिर्व्हसिटी ब्लू किताबाचे मानकरी
बेळगाव : विजापूर येथील सिंधगी सी. एम. मुनगली पदवी महाविद्यालय आयोजित आरसीयू आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या कुस्तीपटूनी 2 सुवर्ण, 2 कांस्यपदक पटकावित यश संपादन केले आहे. पार्थ पाटील, सुरज पाटील यांना ‘युनिर्व्हसिटी ब्लू’ हा किताब देण्यात आले. सिंधगी येथील सी. एम. मुनगली पदवी महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगावच्या कुस्तीपटूनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पार्थ पाटील व सुरज पाटील यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावित. युनिर्व्हसिटी ब्लू किताबचा मान मिळवित पंजाब येथील मोहिली येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटरयुनिर्व्हसिटी स्पर्धेत भाग घेणार आहेत. तर वैष्णव काकतकर व उत्कर्ष पाटील यांनी या स्पर्धेत कास्यपदक पटकाविले. या सर्व कुस्तीपटूनी कृष्णा पाटील, राजु पाटील यांचे बहुमुल्य मार्गदर्शन तर काकतकर महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक सुरज पाटील, प्राचार्य व व्यवस्थापन मंडळाचे प्रोत्साहन लाभत आहे.









