नवी दिल्ली :
पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांच्या जामीन याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ईडीला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. पार्थ चटर्जी यांच्यावर शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप आहे. न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने नोटीस जारी करत याप्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी टाळली आहे. यापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाने चटर्जी यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला होता. चटर्जी विरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.









