वृत्तसंस्था / रिने – रुहेर (जर्मनी)
येथे सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताची महिला तिरंदाजपटू परणीत कौरने तिरंदाजीत रौप्य पदक मिळविले. या क्रीडा प्रकारात द. कोरियाच्या मून येउनने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी वैयक्तिक प्रकारात द. कोरियाच्या मूनने भारताच्या परणीत कौरचा 145-144 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक घेतले. परणीत कौरचे सुवर्णपदक केवळ एका गुणाच्या फरकाने हुकले. या क्रीडा प्रकारात पात्र फेरीअखेर परणीतने आघाडीचे स्थान मिळविले होते. या स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी आतापर्यंत 4 पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये 1 सुवर्ण, दोन रौप्य आणि 1 कांस्यपदकाचा समावेश आहे.









