तपन कुमार डेका ‘आयबी’चे प्रमुख
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निवृत्त आयएएस अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नीती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते या पदावर राहतील. 1981 च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी परमेश्वरन अय्यर यांना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनविण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ही वर्णी लावली आहे. त्यांना ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेचा प्रभावी चेहरा मानले जाते. अय्यर यांच्याबरोबरच वरि÷ आयपीएस अधिकारी तपन कुमार डेका यांची इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘रॉ’चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.