देखभालीकडे मनपा अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष : अबालवृद्धांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : सुविधा पुरविण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : शहर आणि परिसरातील उद्यानांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे अबालवृद्धांची गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान या उद्यानांच्या निर्मितीसाठी केलेला लाखोचा खर्चदेखील वाया गेला आहे. शिवाय शहराच्या सौंदर्यालादेखील बाधा पोहोचू लागली आहे. त्यामुळे या उद्यानांकडे लक्ष कधी देणार? असा प्रŽही आबालवृद्धांतून विचारला जात आहे. शहरात 117 हून अधिक उद्याने आहेत. यापैकी 88 उद्याने मनपाच्या अखत्यारित आहेत. यापैकी 60 उद्याने सुस्थितीत आहेत. तर उर्वरित उद्याने प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. उद्यानाच्या देखभालीसाठी वर्षाकाठी लाखो ऊपयांचा निधी खर्ची घातला जातो. प्रत्यक्षात मात्र उद्यानातून सुविधांपेक्षा असुविधा अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. विरंगुळा म्हणून उद्यानात जाणाऱ्या नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांशी उद्यानात आसनव्यवस्थेची दुर्दशा, लहान मुलांच्या खेळण्याची दुरवस्था आणि इतर वस्तुंचीदेखील मोडतोड झाली आहे. त्यामुळे उद्यानात जाणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. उद्यानातील सिमेंटचे बाक तुटल्याने ज्येष्ठ नागरिकांनी बसावे कुठे, असा प्रŽ पडत आहे. त्याबरोबर खेळण्यांचीदेखील दुर्दशा झाल्याने बालकांची गैरसोय होऊ लागली आहे.
सुविधेअबावी नागरिकांची उद्यानांकडे पाठ
शहरातील महांतेशनगर, अंजनेयनगर, श्र्र्रीनगर, विद्यानगर, बसवनगर यासह इतर ठिकाणी असलेल्या उद्यानांची अवस्था दयनीय झाली आहे. या उद्यानातून आसन, विद्युत, शौचालय आणि इतर सुविधा मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे काही नागरिकांनी उद्यानांकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
उद्यानांची स्वच्छता-देखभाल प्रŽ ऐरणीवर
शहरातील उद्यानांचे एबीसी असे वर्गीकरण करण्यात आले. ए श्र्र्रेणीत 46, बी श्र्र्रेणीत 46, तर सी श्र्र्रेणीत 25 उद्यानांचा समावेश आहे. यापैकी ए श्र्र्रेणीतील उद्यानांची दैनंदीन, बी श्र्रे्रणीतील आठवड्यातून एकदा तर सी श्र्र्रेणीतील उद्यानांची 15 दिवसांतून एकदा स्वच्छता होणे गरजेचे आहे. मात्र काही उद्यानांची वर्षभरदेखील स्वच्छता होत नाही. त्यामुळे उद्यानांच्या स्वच्छतेचा आणि देखभालीचा प्रŽ ऐरणीवर आला आहे.









