वाहतुकीस पूल बंद करण्याची डॉ. अंजली निंबाळकर यांची अधिकाऱयांना सूचना

प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्मयाच्या पूर्व भागाशी मुख्य संपर्क असलेल्या पारिश्वाड ते बिडी या मार्गावर असलेल्या मलप्रभा नदीवरील पूलाला मोठे भगदाड पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोक्मयाचा बनला आहे. पुलावरील एका बाजूला दहा फुटाच्या व्यासाचे भगदाड पडल्याने पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होती. ती धोक्मयाची बनली होती. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी नुकतीच अधिकाऱयांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याची सूचना संबंधित अधिकाऱयांना दिली आहे. खानापूरच्या पूर्व भागात मलप्रभा नदीवर असलेल्या या पुलावरून या भागातील गावांसाठी संपर्काचा प्रमुख रस्ता आहे. सदर रस्ता पूर्व भागातील बऱयाच खेडय़ांना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. दहा वर्षांपूर्वीच हा पूल नव्याने बांधण्यात आला होता. अवघ्या दहा वर्षात या निकृष्ट बांधकामामुळे भगदाड पडल्याचे स्पष्ट होत आहे. पुलाच्या शेजारील जमीन ढासळणार असल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. बिडी पारिश्वाड हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी वारंवार मागणी करण्यात आली. मात्र याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केले आहे. या पुलावर भगदाड पडल्याची माहिती आमदार अंजली निंबाळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व अधिकाऱयांना सूचना दिल्या. तसेच या भागाची वाहतूक तात्काळ बंद करून, उपाययोजना करण्यात यावी अशीही सूचना केलेली आहे. भाजप नेते जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
रस्ता पुनर्बांधणीसाठी निधी मंजुरीची मागणी करणार
याबाबत शुक्रवारी बेंगळूर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सी. सी. पाटील यांना भेटून या पुलाची नव्याने उभारणी करण्यासाठी तसेच या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी करणार असल्याचे माहिती प्रमोद कोचेरी त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.









