वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला नेमबाज श्रीयांका सदनगीने पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेचे आपले तिकीट आरक्षित केले आहे. सध्या कोरियातील चेंगवॉन येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत श्रीयांकाने महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझीशन्स प्रकारात चौथे स्थान मिळविताना 440.5 गुण नोंदविले.
या क्रीडा प्रकारात कोरियाची अनुभवी महिला नेमबाज ली युनसेओने सुवर्णपदक तर चीनच्या हेन जियायूने रौप्यपदक तसेच चीनच्या झिया सियूने कांस्यपदक मिळविले. पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या कोटा पद्धतीनुसार प्रवेश मिळविणारी श्रीयांका सदनगी ही भारताची 13 वी नेमबाज आहे.









